*कोंकण Express*
*राजापूर तालुक्यातील मौजे सागवे रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न*
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न*
आज राजापूर तालुक्यातील मौजे सागवे येथील श्री. पटेल यांचे घर ते बुरंबेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ भाजपा नेते, मा. आमदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या समारोहाचे पौरोहित्य श्री. मिलिंद देवधर गुरुजी यांनी केले तर यजमानपद श्री. विलास देवधर यांनी भूषवले. श्री. प्रमोद जठार यांनी नारळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. याबद्दल अनेक स्थानिक नागरिकांनी प्रमोद जठार यांच्यासहित महाराष्ट्र सरकार व मा. मोदीजींचे आभार मानले.
यावेळी राजापूर (पू.) तालुकाध्यक्ष श्री. सुरेश गुरव, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुयोगाताई जठार, श्री. विद्याधर राणे, युवा उपाध्यक्ष श्री. विनायक कुवेसकर, श्री. दाऊदभाई काझी, श्री. मसूदभाई शेख, श्री. संकेत मयेकर, श्री. वैभव मेस्त्री, श्री. ईश्वर जाधव, कंत्राटदार श्री. नितीश कुडाळी, श्री. बापू घाटे, श्री. शिवा पटेल, श्री. दीपक सागवेकर, श्री. अनंत गुरव, श्री. विलास तांबे, श्री. विलास गावकर तसेच अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.