*कोंकण Express*
*कणकवली हळवल फाटा येथे महिंद्रा ट्रॅक्स पलटी…*
*दहा प्रवासी जखमी : उपजिल्हा रूग्णालयात दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे मालवण ते मुंबई जाणारी महिंद्रा ट्रॅक्स (क्र. एमएच ११ बीएच ०११५)
पलटी झाली. यात ट्रॅक्समधून प्रवास करणारे दहा जण जखमी झाले असून त्यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सायंकाळी साडे सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत अपघातातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले मालवणहुन मुंबईच्या दिशेने जाताना हळवल फाटा येथील अवघड वळणावर चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे गाडी पलटी झाली अशी माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थांनी दिली.