डोळ्यांची शस्त्रक्रिया केली अन् नजरच गेल्याची धक्कादायक घटना

डोळ्यांची शस्त्रक्रिया केली अन् नजरच गेल्याची धक्कादायक घटना

*कोंकण Express*

*डोळ्यांची शस्त्रक्रिया केली अन् नजरच गेल्याची धक्कादायक घटना*

*आ. वैभव नाईक यांची त्या नेत्र रुग्णालयावर धडक*

*विवेकानंद नेत्रालयातील डॉक्टरांना विचारला आमदार वैभव नाईक यांनी जाब*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मालवण सुकळवाड येथील शंकर टेंबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवली येथील विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पुनम जगदाळे यांना जाब विचारला. या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांनी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करा, या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी आ. वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर आदि उपस्थित होते. यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार करत जिल्हा रुग्णालयात ३ हजारात होणाऱ्या शस्त्रक्रियेला २७००० हजार रुपये कसे लागतात ? असा सवाल देखील उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!