*कोकण Express*
*दिविजा वृद्धाश्रमात नाताळ साजरा*
कणकवली : येथील दिविजा वृद्धाश्रमात यावर्षी नाताळ न्यु लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने वृद्धाश्रमातील आजी – आजोबांसोबत आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी आश्रमातील आजी – आजोबांना कपडे व खाद्य पदार्थाचे वतो करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी राजन भगत, विष्णू पाताडे, डॉ. कावले व दिविजा वृद्धाश्रमातील श्री. पाठक व इतर सहकारी उपस्थित होते.