राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जेष्ठांचा सन्मान

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जेष्ठांचा सन्मान

*कोकण Express*

*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जेष्ठांचा सन्मान*

*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार खलीफे मॅडम (कणकवली च्या सुकन्या, काजी), जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, हा सन्मान सोहळा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आयोजित केला,

*आज दिनांक २८/१२/२०२३ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे, कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव यांना सी आर चव्हाण ( समाज बांधव) यांच्या हस्ते भाऊ डगरे , निलेश मालंडकर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

*सुनिल काणेकर कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, यांना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोक्टेशनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

*यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला, तसेच सन्मान मुर्ती ना आपल्या विभागात पक्षाचे कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळावी, आणि पक्ष जोमाने वाढवावा, तसेच १३६ व्या दिनाच्या निमित्ताने सुध्दा निलेश मालंडकर यांच्या साहाय्याने आम्ही जिल्हा केंद्रात जाऊन महाराष्ट्र शासनाच्या मंत्री महोदयांच्या वाहनाचे सारथी होण्याचे भाग्य लाभलेल्या प्रथम महिला पोलीस दलातील आमच्या भगिनी चा सन्मान केला होता, असे प्रतिपादन राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले,

*यावेळी सी आर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले,

*सन्मान मुर्ती जाधव, काणेकर यांनी आभार व्यक्त केले,

*यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

*राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र व शालेय मंडळाचे सदस्य उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!