*कोकण Express*
*कणकवलीतील रिक्षा चालकांने केली प्रवाशाचे लूटमार*
*कणकवली पोलिसात गुन्हा दाखल*
*प्रामाणिक रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांच्या वर गदा*
भाडयाने रिक्षात बसलेल्या व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कमेसह मोबाईल ची लूट करण्याचा प्रकार कणकवलीत रिक्षा चालक व त्याच्या सहकारी आरोपीकडून घडल्याने प्रामाणिक पणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पीआय अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ, राजेंद्र गाडेकर, शरद देठे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. कणकवली पोलीस ठाण्यात धीरेंद्र कुमार श्रीकांत यादव (रा. उत्तरप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीनुसार धिरेंद्र कुमार 25 डिसेंम्बर 2023 रोजी रात्री 9.30 वाजता मोटरसायकलने कणकवलीत आला होता. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात त्याने रेल्वे स्टेशनजवळील समर्थनगरकडे जाण्यासाठी रिक्षा क्र. MH 07 – AH – 2949 मध्ये बसला. त्यानंतर रिक्षचालक अल्ताफ अत्तर व सहकारी आरोपी सुहास घोगळे यांनी धीरेंद्रकुमार याला मारहाण करून त्याला गोव्याच्या दिशेने घेऊन गेले. गोवा बॉर्डरपर्यंत नेऊन पून्हा दुसऱ्या दिवशी कुडाळात आणले व त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन 18 हजार रुपये एटीएम मधून काढून घेतले, धिरेंद्रकुमार चा 20 हजार चा मोबाईल हिसकावून घेत त्याला कुडाळ एसटी बस स्टँड येथे सोडून दिले. त्यानंतर धिरेंद्रकुमार याने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. य गुन्ह्यात आरोपी अल्ताफ अत्तर आणि सुहास घोगळे याला कणकवली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पीएसआय राजेंद्र गाडेकर करत आहेत.