आ. नितेश राणे यांची आणखी एक वचनपूर्ती : कोळपे गावात जिओ टॉवर कार्यान्वित

आ. नितेश राणे यांची आणखी एक वचनपूर्ती : कोळपे गावात जिओ टॉवर कार्यान्वित

*कोकण Express*

*आ. नितेश राणे यांची आणखी एक वचनपूर्ती : कोळपे गावात जिओ टॉवर कार्यान्वित*

*नासीर काझी, हुसेन लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश*

*गावकऱ्यांच्या आनंदाला आले उधाण : आ. नितेश राणे यांचे मानले आभार*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांच्या वचनपूर्तीत आणखी एक भर पडली आहे. जिओ टॉवर उभारण्याचा कोळपे वासियांना दिलेला शब्द आमदार नितेश राणे यांनी वर्षभरात पूर्ण करून दाखवला आहे. शुक्रवारी गावातील जिओ टावर सुरू झाल्याची बातमी प्रत्येकाच्या कानी पडताच गावकऱ्यांच्या आनंदाला अगदी उधाण आले होते. आतापर्यंत कधी न वाजणारा जिओ मोबाईल गावात खणखणू लागला लागला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर व ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
इतर मूलभूत गरजाबरोबर मोबाईल ही देखील मूलभूत गरज बनली आहे. गावागावातून मोबाईल टॉवर द्या, अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार अशी अनेक निवेदने प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. परंतु कोळपे याला अपवाद ठरला आहे. आमदार नितेश राणे यांच्या कोळपेतील गावभेट दौऱ्यात, साहेब’ गावात मोबाईल टॉवर द्या. आणि तालुक्यात एक नंबरचे मताधिक्य घ्या. असे ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांना सांगितले होते. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आ. नितेश राणे यांना गावाने तालुक्यात एक क्रमांकाचे मताधिक्य देऊन आपला शब्द पाळला. आ. नितेश राणे यांनी देखील वचनपुर्तीसाठी सर्व चक्रे वेगाने फिरविली. आणि वर्षभराच्या कालावधीत गावात जिओ टॉवर उभारून कार्यान्वितही केला आहे. दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्या लाडक्या आमदाराचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषता वयोवृद्ध व्यक्तींचा आपल्या बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क होत नव्हता. तो संपर्क आता थेट घरातून होत आहे. या टॉवरचा फायदा कोळपेसह उंबर्डे, तिथवली, दिगशी व वेंगसर मधील काही वाड्यांनाही होणार आहे. टॉवर कार्यान्वित केल्या बद्दल सरपंच आयशा लांजेकर, उपसरपंच बाबाला लांजेकर व सदस्यांनी गावच्या वतीने आ. नितेश राणे, नासीर काझी, हुसेन लांजेकर यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!