महेश सरनाईक समाजभूषण, सुरेश सामंत यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

महेश सरनाईक समाजभूषण, सुरेश सामंत यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

*कोकण Express*

*महेश सरनाईक समाजभूषण, सुरेश सामंत यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान*

*कुडाळदेशकर गाैड ब्राह्मण सभेचे १२६ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात*

*सिंधुदुर्ग :*

कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले. यामध्ये पत्रकार तथा ‘लोकमत’चे उपमुख्य उपसंपादक, महेश सरनाईक यांचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार तर फोंडा, कणकवली येथील सुरेश सामंत यांचा जीवनगाैरव पुरस्काराने बेळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक संजय कुळकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबईचे १२६ वे वार्षिक स्नेहसंमेलन शारदाश्रम विद्यामंदिर दत्तमंदिर सभागृह, भवानी शंकर मार्ग, दादर पश्चिम मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरे झाले.

यावेळी कार्याध्यक्ष वीणा दाभोलकर, अध्यक्ष जगदीश वालावलकर, उपाध्यक्ष मधुकर सामंत, विश्वस्त नरसिंह पंतवालावलकर, खजिनदार योगेश खानोलकर, कार्यवाह महेश राळकर, कार्यवाह यशवंत बागलकर आदी उपस्थित होते. सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत शारदाश्रम विद्यामंदिरच्या सभागृहात वधू-वर व पालक मेळावा झाला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक मनीष दाभोलकर, सूत्रसंचालन पाैर्णिमा खानोलकर, तर आभार रत्नाकर तेंडोलकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!