*कोकण Express*
*तळेरे येथे ‘ सिंधुश्री ,शरीर सौष्ठव” स्पर्धा*
*कासार्डे प्रतिनीधी : संजय भोसले*
तळेरे द फ्लेक्स फिटनेस व एसआरकेस फिटनेस सेंटरच्या वतीने सिंधुदुर्ग श्री खुली शरीरसौष्ठव स्पर्धा व उघ्दाटन सोहळा सोमवार दि. १ जाने. २०२४ रोजी सायं ४:०० वा. तळेरे बसस्थानक समोर आयोजित करण्यात आला असून स्पर्धेचे उद्घाटन भारतीय शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले याच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या सिंधुदुर्ग श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रू.२० हजार, द्वितीय रोख रू.१५ हजार, तृतीय रोख रू. १० हजार तसेच ५०-५५, ५५-६०, ६०-६५, ६५-७०,७० च्या वरती प्रत्येक वजनी गटात प्रथम २ हजार ५००,व्दितीय २ हजार, तृतीय १ हजार ५००,चतुर्थ १ हजार व पाचव्या क्रमांकास ५०० देऊन संग्राम चौगुलेसह मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, माजी सभापती दिलीप तळेकर, डाॅ. विलास धानू, संजय पाताडे, अभिमन्यू पाताडे उपस्थित राहणार आहेत.भारतीय शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले हे ८५ किलो गटात मिस्टर युनिव्हर्स २०१२ चा किताब पटकावला असून सहा वेळा मिस्टर इंडिया तर पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब पटकावला आहे.तरी जिल्ह्यात प्रथमच येत असलेल्या संग्राम चौगुले याच्या स्वागतासाठी व जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अभिमन्यू पाताडे मोबा. ८२०८०३५१६५ व द फ्लेक्स फिटनेस आणि एसआरकेस फिटनेस सेंटरच्या यानी केले आहे.