जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी 7 जानेवारी पर्यंत नोंदणी करावी

जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी 7 जानेवारी पर्यंत नोंदणी करावी

*कोकण Express*

*जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी 7 जानेवारी पर्यंत नोंदणी करावी*

*सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का):*

जागतिक कौशल्य विकास स्पर्धा २०२४ मध्ये फ्रान्स (LYON) येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in या लिंकवर जाऊन दिनांक ०७ जानेवारी 2024 पर्यंत नोंदणी करावी. जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन गणेश पां. चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य विकास स्पर्धा २०२४ आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म ०१ जानेवारी १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ITIs, Polytechnic, MSME Tools Rooms, CIPET, Engineering College, IHM, Hospitality Institute, Corporate Technical Insititute, Skill Training Institute, Colleges, Institute of Jewellery Making, Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील. उमेदवारांना नाव नोंदणी करण्यासाठी ०७ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
00000

जल जीवन मिशन अंतर्गत लघुचित्रपट स्पर्धांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का): जल जीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
जल जीवन मिशन च्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीय खुल्या लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद विधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुचित्रपटाची निर्मिती स्वत: केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वत: केलेले असावे. या अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभाग त्यांनी त्यांच्या कामाकरीता तयार केलेले चित्रपट या स्पर्धेकरीता सादर करण्यात येऊ नयेत, लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात आलेले साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असावे. लघुवित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना अस्मिता दुखावणारे नसावे. या स्पर्धेकरीता ३ ते ५ मिनिट कालावधीचा लघुचित्रपट तयार करावयाचा आहे. कॉपी राईट उल्लघन होत नसलेबाबत स्वयंघोषणापत्र स्पर्धकांनी स्वत: द्यावयाचे आहे.
या स्पर्धेकरीता लघुचित्रपटाचे विषय १. पाण्याचे शाश्वत स्रोत २. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती ३. जल संवर्धन ४.हर घर जल घोषित गाव ५. जल जीवन मिशन यशोगाथा ६. विविध योजनांचे कृती संगम प्रमाणे आहेत. तर स्पर्धेकरिता बक्षीस रक्कम रुपये प्रथम क्रमांक ३१ हजार. व्दितीय २१ हजार व तृतीय ११ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी असणार आहे. या स्पर्धेकरीता जमा करण्यात आलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र व निवडीचे अधिकार प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे असतील.
जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत जिल्ह्यातील लघुचित्रपट निर्माते यांनी सहभाग घेऊन आपले लघुचित्रपट दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडे सादर करावेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!