*कोकण Express*
*कणकवलीतील रहिवासी परेश वरवडेकर यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील मारुतीआळी येथील रहिवासी बी. ई. सिव्हिल इंजिनिअर परेश सुरेश वरवडेकर (46) यांचे आज बुधवारी पहाटे गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, असा परिवार आहे. कणकवलीत त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. सध्या कुडाळ एमआयडीसी मध्ये थंड पेय बनविण्याची त्यांची फॅक्टरी सुरू होती. त्यांच्यावर आज बुधवारी सकाळी मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.