*कोकण Express*
*सामाजिक जाणिवेतून फादरां चा सन्मान सोहळा*
*आज दिनांक २५/१२/२०२३ रोजी कणकवली, फणसवाडी येथील चर्च ला भेट देऊन, फादर मॅन्युएल डिसिल्वा यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय या सर्व मंडळाचे वतीने आणि समस्त कणकवली वासी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता,
*कोरेसाव डिसोझा, रोजीना फर्नांडिस, सल्लागार सुभाष उबाळे, अविनाश गावडे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सन्मानित केले,
*सर्व प्रथम फादर मॅन्युएल डिसिल्वा यांनी मंडळाचे संस्थापक व सदस्य यांना आपल्या ऑफिस मध्ये आमंत्रित करुन या आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली,
*संस्थापक पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आज आम्ही आमच्या सर्व मंडळाच्या वतीने, फणसवाडी च्या चर्च मध्ये भेट देऊन, कणकवली शहराच्या व आमच्या सर्व मंडळाच्या वतीने, फादर मॅन्युएल डिसिल्वा यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, याचे कारण की समाजा मध्ये एक मेसेज जावा, सर्व धर्म सम भाव हि आपल्या देशाची पंरपरा असून, ती आपल्या देशाची संकृती असून, म्हणून ती अशीच पुढे चालत रहावी, भगवंत येशू ख्रिस्त यांचा हाच संदेश होता शांततेचा, हा उपक्रम सिंधूदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात हि आमच्या सर्व मंडळांनी असेच उपक्रम राबवले आहेत, आणि ते याही पुढे असेच सुरू राहतील अशी गवाही देऊन, त्यांनी आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार स्विकारले बद्दल आभार व्यक्त केले,
*याप्रसंगी व्हिक्टोरिया फर्नांडिस, ब्रॅडन डिसोजा, एलिस्टर डिसोजा, रॅक्स म्हापसेकर, जाकिन डिसोजा, एन्थोनी डिसोजा, जेरेट लोबो, सॅम्युएल फर्नांडिस, अॅलेक्स म्हापसेकर व समस्त ख्रिस्ती बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,
*यावेळी सुनिल काणेकर, सईद नाईक, प्रसाद पाताडे, महेश वांगणकर,भगवान कासले, प्रसाद घाडिगावकर,आदी सर्व मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.