*कोकण Express*
*गिरोबा जत्रोत्सवात “शिवकन्या मन्सादेवी”*
*मालवण ः प्रतिनिधी*
नांदरुख – मालवण गावच्या गिरोबाच्या जत्रोत्सवात गणपती-कार्तिकेय यांची सख्खी बहीण असलेल्या “शिवकन्या मन्सादेवी” या पौराणिक कथेवरील नाटक सादर करण्यात आले. त्यामुळे बर्यांचश्या भाविकांना गणपतीच्या या माहित नसलेल्या बहिणीबाबतच्या कथानकाचा आस्वाद घेता आला.
विशेष म्हणजे गाभार्यात गिरोबाच्या पिंडीमागे केळीच्या सोप्यापासून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
जत्रोत्सवाला नांदरुख गावच्या पुर्वीच्याच वाड्या असलेल्या मालवण, देवबाग, तारकर्ली, घुमडे आदी १० गावांतील भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
गिरोबाच्या आकर्षण पालखीचे पारंपारिक सनई, ढोल-ताशांच्या गजरात आणि नयनरम्य फट्याक्यांच्या आतेषबाजीत मंदिरात आगमन झाले. गाभार्यातील धार्मिक पोथी कथनानंतर पालखी प्रदक्षिणा झाली.
मध्यरात्री नंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाच्या आड दशावतारानतंर “शिवकन्या मन्सादेवी” हे नाटक सादर करण्यात आले.