*कोकण Express*
*कोकणातील मिल कामगारांना मिळणार हक्काच घर …..*
सिंधुदुर्ग जिल्हातील मिल कामगाराना घर शासनाकडून मिळण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख (भाजपा)प्रमोद जठार माजी आमदार यांच्याकडे समस्या मांडला त्याबाबत प्रमोद जठार यांनी मी देखील एक मिल कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे आपल्या समस्या मी आमदार सुनिल राणे (अध्यक्ष गिरणीकामगार शासन समिती )यांच्याकडे पत्राव्दारे मांडतो आणि आपल्या सर्वांना हक्काच घर लवकरात लवकर मिळावे हि मागणी करतो
आज कुडाळ येथील एमआयडीसी शासकीय विश्रामगृहात गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी सौ रश्मी ताई लुडबे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली या बैठकीला माजी आमदार तथा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार उपस्थित होते या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीत असणारे प्रश्न अपूर्ण कागदपत्र तासेच शासकीय बाबतीत येणाऱ्या अडचणी या शासनाच्या दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन जठार यांनी यावेळी दिले
गिरणी कामगारांचे सुपुत्र असलेले प्रमोद जठार यांनी या प्रश्नावर तोडगा काढून गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून घरे मिळवून देणार असे आश्वासन दिले तदनंतर माजी आमदार प्रमोद जठार गिरणी कामगार शासन समिती अध्यक्ष आमदार सुनील राणे यांचेशी संपर्क साधून 30 नोव्हेंबर 2023 रोजी बैठक मुंबईत निश्चित करण्यात आली