*कोकण Express*
*माजी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील सांगवे तेलंगवाडी येथील शाळेच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ माजी जि प अध्यक्षा सौ . संजना संदेश सावंत यांच्या शुभहस्ते पार पडला .
गेली काही वर्षे जुन्या इमारती मुळे मुलांना बहुतांश समस्याना सामोरे जावे लागत होते .याबाबत येथील ग्रामस्तानी संदेश सावंत यांच्या कडे या बाबत पाठपुरावा केला होता .विद्यार्थी ,शिक्षक व पालकांच्या तक्रारिंची दखल घेत गोट्या सावंत यांनी विशेष लक्ष घालत निधी मंजूर केला होता. त्यामुळे आज ही भव्य दिव्य अशी इमारत उभी राहणार आहे. त्या मुळे विध्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ. मयुरी मुंज, माजी उपसरपंच श्री. म्हापणकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. कांबळी, ग्रामपंचायत सदष्य राजू सापळे, गावकर काका, श्री. प्रकाश राणे ग्रामस्थ, महिला, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिका कुडतरकर उपस्थित होते.