हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले ; प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष

हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले ; प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष

*कोकण Express*

*हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले ; प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष*

*हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले आयोजित दीपावली शो – टाईम चे उद्घाटन*

हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दीपावली शो टाईम चे आयोजन करण्यात आले . पाच दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले .
यावेळी शुभेच्छा देताना हॉस्पिटल नाका मंडळाचे कौतुक करत , वेंगुर्ले शहराला जो सांस्कृतिक वारसा आहे तो टिकवण्याचे काम ह्या मंडळा मार्फत केले जाते याबद्दल अभिनंदन केले . तसेच या मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर सामाजिक उपक्रम घ्यावेत , असे आवाहन केले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दिनेश तानावडे , विनायक शिरवणकर , शाम कौलगेकर , राजु वजराठकर , मंडळाचे अध्यक्ष अँड. मनिष सातार्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र गावडे , रामचंद्र सावंत , ज्ञानेश्वर कळेकर , राहुल वेंगुर्लेकर , जयंत सावंत , रुपेश सावंत , प्रफुल्ल सावंत , करण निरवडेकर , सौरभ भोसले , मनिष कळेकर , कौस्तुभ गवस , पुरुषोत्तम मडकईकर , मकरंद होळकर , सिद्धेश मांजरेकर , निखिल शिरोडकर , सचिन मांजरेकर तसेच मंडळाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!