पेंडूर ग्रामपंचायत सरपंच संतोष गावडे यांचा आदर्शवत कामाने श्रीगणेशा

पेंडूर ग्रामपंचायत सरपंच संतोष गावडे यांचा आदर्शवत कामाने श्रीगणेशा

*कोकण Express*

*पेंडूर ग्रामपंचायत सरपंच संतोष गावडे यांचा आदर्शवत कामाने श्रीगणेशा*

राजकारणाचा वापर समाजकारणासाठी करायचा असतो. राजकारणामध्ये अनेक पेच आणि डावपेच आखले जातात परंतु निवडणुका संपल्या की समाजभान जपत काम करणे अभिप्रेत असते. आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो तेव्हा सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो याचं भान जेव्हा त्या लोकप्रतिनिधीला असतं त्यावेळी त्याच्याकडून आदर्शवत काम होत असते.
आत्ताच वेंगुर्ले तालुक्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपचे वर्चस्व दिसून आले. पेंडुर ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच म्हणून संतोष गावडे हे भरघोस मताने निवडून आले. तसेच नऊपैकी सहा सदस्य भाजप चे निवडून आल्याने पेंडूर ग्रामपंचायती वर भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले.
मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता शाश्वत विकासाच्या दृष्टीने मिरवणुका, डिजे,फटाके,दारू या माध्यमातून ‘सेलिब्रेशन ‘ न करता थेट सरपंच संतोष गावडे आणि सहकाऱ्यांनी श्री देव घोडेमुख ते चिरेखण या रस्त्याची साफसफाई करत आपल्या कामाची सुरुवात करून एक आदर्श प्रस्तापित केला. अशाप्रकारे आगळ वेगळ काम करून एक आदर्श संतोष गावडे आणि सहकाऱ्यांनी इतर लोकप्रतिनिधींना घालून दिला आहे. पेंडूर गावचा सर्वांगीण विकास सरपंच संतोष गावडे निश्चितच करशील करतीलच हे त्यांनी कृतीतून दाखऊन दिले आहे. सरपंच श्री संतोष गावडे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन आणि वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!