कणकवली येथील गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला आग

कणकवली येथील गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला आग

*कोकण Express*

*कणकवली येथील गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला आग*

*आगीवर नियंत्रण ; मोठी दुर्घटना टळली*

*कणकवली / प्रतिनिधी*

शहरातील गोकुळधाम हॉटेल खाली असलेल्या श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला शुक्रवारी दु. २.४५ वा. सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र तातडीने आग विझवण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुकान मालक संजीव शिरसाट हे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान दुकानातून धूर येत असल्याची कल्पना शेजारच्यांनी दुकान मालकाना दिली. दुकान मालक आणि तातडीने धाव घेत लगेच शटर उघडले. यावेळी दुकानाचे काउंटर व पुढील भागाला लागलेली आग तातडीने अग्निरोधक यंत्राच्या माध्यमातून विजविण्यात आली. तसेच तातडीने नगरपंचायतचा बंब ही घटनास्थळी दाखल झाला होता. आग तातडीने विजविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

आगीबाबत माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, अनिल हळदिवे, आनंद पारकर, पंकज पेडणेकर, साहिल शंकरदास, तुषार मोरये प्रतीक कडुलकर, यश मोडक, नगरपंचायतचे मनोज धुमाळे, गणेश लाड, विनोद जाधव, श्री ताम्हणकर, यांच्यासह महसूलचे मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी सुवर्णा कडुलकर आदींनीघ टनास्थळी धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!