*कोकण Express*
*दिवीज्या वृद्धाश्रमांकडून विद्यार्थ्यांना दिवाळीची अनोखी भेट*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना स्वस्तिक फाउंडेशन संचलित असलदे येथील दिवीज्या वृद्धाश्रमात तयार केलेल्या सुगंधी उठण्याचे मोफत वाटप करण्यात आले.आश्रमाचे संचालक श्री. संदेश शेटे व त्यांचे सहकारी श्री.डी.जी. चव्हाण सर यांचे आभार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी मांनले.
या कामी महाविद्यालयाचे एनएसएस विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे, डॉ. रायबोले, डॉ. राजाराम पाटील, श्री.दीपक सावंत आदी उपस्थित होते.
त्यावेळी स्वस्तिक फाउंडेशन मार्फत दिवीज्या आश्रमात युवा उपक्रम (करिअर कौन्सिलिंग) संजीवनी आरोग्य (आरोग्य तपासणी) असे अनेक उपक्रम राबवले जातात. याची माहिती डी.जी.चव्हाण सर यांनी दिली. त्याचबरोबर या सर्व उपक्रमाचे अधिक माहिती व कार्याची जवळून ओळख होण्यासाठी आश्रमाला एकदा भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
त्याप्रसंगी बोलताना समाजातील वंचित घटकांना सन्मानाचे जगणे देणाऱ्या आश्रमाला व त्यांच्या संचालकांना खूप शुभेच्छा प्रभारी प्राचार्य डॉ.कामत यांनी दिल्या.
डॉ. सुरवसे म्हणाले की दिवाळीची ही फार महत्त्वाची आणि अनोखी भेट मिळाली त्यामुळे एक वेगळे सुख समाधान मिळाले दिवाळीच्या अनोख्या शुभेच्छांचे आम्ही सदृदयतेने स्वीकार करतो. असे प्रतिपादन केले.
या कामी संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष सावंत सेक्रेटरी श्री.चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री.आनंद मर्ये व सर्व संचालकांनी स्वस्तिक फाउंडेशनचे आभार मानले आणि शुभेच्छा ही दिल्या.