*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात PMJAY ई कार्डचे ऑनलाइन वितरण*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कणकवली व पंचायत समिती कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे PMJAY ई कार्ड ऑनलाइन डाउनलोड करून वितरीत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश यादव, डॉ. अमोल केंद्रे, डॉ. शुभदा एकावडे, शंकर राठोड, विलास फोंडके, फोंडाघाट ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर प्रज्ञा सामंत यांनी
संदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. गणेश यादव म्हणाले की शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजना आहेत. त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा एक योजना म्हणजे सर्व असं वाटतं परंतु त्यावेळी वेगवेगळ्या असतात त्या ज्ञात असल्या पाहिजेत.
डॉ. केंद्रे यांनी आपल्याला योजनाची माहिती पाहिजे. त्याची पूर्तता सुद्धा आपण केली पाहिजे. त्याचबरोबर आपण इतरांनाही सांगितले पाहिजे. आपल्या मोबाईलवरून त्याची नोंदणी करता येते. ते आपण केले पाहिजे. असे प्रतिपादन केले.
डॉ. कामत म्हणाले की या योजना आता प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागल्या आहेत. किंबहुना महाविद्यालयीन मुलांनी त्या पोचवल्या पाहिजेत. महाविद्यालय आपल्यालापर्यंत ही माहिती पोहोचवते. तुम्ही ती इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यामुळे सर्वांची आर्थिक कुचुंबना थांबेल.
डॉ. शुभदा एकावडे म्हणाल्या की शासन अनेक प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. परंतु आपण त्याचा उपयोग करून घेत नाही आणि तक्रारी करत बसतो. अगदी सरकारी रुग्णालयात उपचार चांगल्या प्रतीचे मोफत उपचार मिळतात. यावर आपण विश्वास ठेवत नाही. आणि आर्थिक भुर्दंडात पडतो.
श्री. शंकर राठोड म्हणाले की सर्वसामान्यांना या योजनांची माहिती करून देणे ही सुद्धा एक जनसेवा आहे. आरोग्य विषयक वाढलेला खर्च आता सरकार उचलत आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे शिवाय इतरांनाही करून दिला पाहिजे. ऑनलाइनच्या जमान्यात हे आता एका क्लिकवर होते. फक्त आपण ते जबाबदारीने केले पाहिजे.
आयुष्यमान भव मोहिम यशस्वी करण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक मा. संजयजी आग्रे, चेअरमन श्री. सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री. शेखर लिंग्रस, खजिनदार श्री. आनंद मर्ये, श्री. महेश सावंत, एन एस एस विभाग प्रमुख प्रा. डॉ .बालाजी सुरवसे, प्रा. संतोष आखाडे, श्री. दीपक सावंत इत्यादी मान्यवरांनी बहुमोल योगदान दिले.