आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधवांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे केले दहन

आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधवांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे केले दहन

*कोकण Express*

*आरक्षणाच्या मागणीसाठी कणकवलीत मराठा बांधवांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे केले दहन*

*मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मेणबत्ती पेटवत दिला पाठिबा*

*सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी*

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेले सात दिवस उपोषण छेडत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कणकवलीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आता पर्यंत ज्यांनी आरक्षणासाठी आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी मेणबत्ती पेटवत समाज बांधवानी मनोज जगे यांना पाठिंबा दिला. या कँडल मार्चमध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाचे नेते एसटी सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, सोमा गायकवाड, रामदास विखाळे, सचिन सावंत, रिमेश चव्हाण, राजू राणे, योगेश सावंत, उद्योजक सतीश नाईक, संदीप राणे, दामू सावंत, संतोष परब, महेंद्र सांबरेकर, लघु वारंग, अनंत राणे, सचिन सावंत, रुपेश आमडोसकर, अजय सावंत, भाई साटम, औदुंबर राणे, सखाराम सपकाळ, अनुप वारंग, अभिजीत सावंत, तेजस राणे, मंगेश सावंत, उपस्थित समाजाच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षनिक उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!