*कोकण Express*
*भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका चिटणीस पदी श्री विश्वास पांगुळ यांची वर्णी..*
*भाजपा युवा मोर्चाच्या आयोजित जिल्हा कार्यकारणी मध्ये देण्यात आले नियुक्ती पत्र..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भारतीयजनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी काल रोजी ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा च्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुक्याची उर्वरित कुडाळ तालुका युवा मोर्चा ची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.माजी मुख्यमंत्री नारायण राणे,माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण,माजी खासदार प्रदेश सचिव श्री निलेशजी राणे,आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार कुडाळ तालुका चिटणीस पदी श्री विश्वास सखाराम पांगुळ यांची निवड करण्यात आली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात NSUI तसेच स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरवात केली होती त्याच्या कामाचा आढावा घेत कुडाळ तालुका युवा मोर्चा चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे व भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री,आनंद शिरवलकर,कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे,सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.