सायबर गुन्हा सावधगिरी हाच उपाय: (पोलीस उपनिरीक्षक मालवण) प्रगती खोत

सायबर गुन्हा सावधगिरी हाच उपाय: (पोलीस उपनिरीक्षक मालवण) प्रगती खोत

*कोकण Express*

*सायबर गुन्हा सावधगिरी हाच उपाय: (पोलीस उपनिरीक्षक मालवण) प्रगती खोत*

आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये भारतासारख्या देशात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात समाजामध्ये होत असून दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे अशा परिस्थितीत मोबाईलचा जगातील फेसबुक ,व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सर्व बाबींशी संपर्क येत असून यातून सायबर गुन्हे वाढत आहेत. एक आव्हान बनत चालले आहेत. यातून सावधगिरी हाच एक उपाय आहे असे उद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या प्रेरणेतून व महाराष्ट्र ज्ञान संगणक महामंडळाच्या मालवण तालुक्यातील स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्बोधन पर मार्गदर्शन करताना वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं) कट्टा या ठिकाणी काढले.
या कार्यक्रमाच्या आयोजक स्मिता कम्प्युटर च्या संचालिका सौ श्रद्धा सुनील नाईक यांनी आपल्या संगणक जीवनातील अनुभव कथन करताना ,आज सायबर गुन्हा म्हणजे काय? याबद्दल माहिती सांगत असताना आपली मुले बालगुन्हेगार व युवा हे गुन्हेगाराच्या यादीत येत आहेत. याची कारणे व समस्या तसेच याबद्दल सावधगिरी म्हणून कोणता उपाय करावा यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मिता कम्प्युटरच्या वतीने शिवजयंती व शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक मालवण खोत मॅडम तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिवलकर मॅडम, मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कट्ट्याचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी करताना कार्यक्रमाचा उद्देशा संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी वराडकर इंग्लिश मीडियम कट्टा तसेच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांचे 450 विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
स्मिता कम्प्युटरच्या विद्यार्थिनी यांनी पथ नाट्यद्वारे सायबर गुन्ह्याची दाहकता व त्यावरील उपाय या संदर्भात उत्कृष्ट माहिती उपलब्ध करून दिली यानंतर उपस्थित सर्वांना सायबर प्रतिज्ञा ची शपथ देण्यात आली.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी, उपस्थित होते. पर्यवेक्षिका सौ देवयानी गावडे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन श्री संजय पेंडुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!