सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

*कोकण Express*

*सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल*

*कणकवली पोलिसाची रविवारी पहाटे 3 वाजता कारवाई*

*कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र*

कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस या ठिकाणी जुगार सुरू असल्या ची गुप्त माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी याप्रकरणी रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलिसांच्या पथकासह छापा मारला. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी कणकवलीत अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकली जाणार असून, अवैध धंद्या बाबत माहिती मिळाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कारवाईत कणकवली पोलिसांनी सिद्धेश मोरोजकर, निलेश हेरेकर, संदीप वंडकर, राजेश परब व सुजित बाईत यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!