कणकवलीत अवैध वाळू वाहतूकीवर तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांची धडक कारवाई

कणकवलीत अवैध वाळू वाहतूकीवर तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांची धडक कारवाई

*कोकण Express*

*कणकवलीत अवैध वाळू वाहतूकीवर तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांची धडक कारवाई*

*कारवाईमुळे अवैध वाळू  वाहतूकदारांचे धाबे दणाणले*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांवर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे व पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी धड़क रविवारी पहाटे कारवाई सुरु केली आहे..

कणकवली तहसीलदारांनी चार अवैध वाळु वाहतुकीच्या डंपर वर कारवाई केली. महसूल चे पथक या कारवाई सहभागी झाले होते. कलमठ व कणकवली भागात रत्नागिरीच्या दिशेने वाळू घेऊन जाणारे डपर ताब्यात घेतले. हे ताब्यात घेतलेले डंपर कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. तर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलीस विनोद चव्हाण किरण मेथे, आदींच्या पथकाने मसुरकर किनई रोडवर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीच्या डंपर वर कारवाई करत हा डंपर तहसीलदार कार्यालयाच्या स्वाधीन केला आहे. या सर्व करणाऱ्या डंपर वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!