*कोकण Express*
*मनसेच्या कुडाळ येथील मेळ्याव्यास कोकणी जनतेची तुफान गर्दी*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
मनसे अध्यक्ष सन्मानीय मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे कोकण नेते मा.श्री. शिरीष सावंत तसेच पक्ष निरीक्षक मा. श्री. संदिप दळवी व मा. श्री. गजानन राणे, नंदू तलावडेकर यांच्या सुचनेनुसार व अध्यक्षतेखाली जिल्हातील मनसेचे सर्व महाराष्ट्र सैनिक, तसेच अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधीकारी यांचा कार्यकर्ता मेळावा
रविवार दि. २९ ऑक्टोंबर २०२३ कुडाळ येथे आयोजित केला होता, त्याला कोकणी जनतेने उस्फूर्त उपस्थित राहून, सन्माननिय राज साहेबांच्या मागे खंबीरपणे कोकणी जनता उभी आहे हेच दर्शविले. त्यामुळे कोकणतील इतर प्रस्थापित पक्ष याचा नक्कीच धसका घेतील.