मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानचे शिक्षण घ्या आणि जगाचे नेतृत्व करा

मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानचे शिक्षण घ्या आणि जगाचे नेतृत्व करा

*कोकण Express*

*मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानचे शिक्षण घ्या आणि जगाचे नेतृत्व करा…*

*शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर आणली. भविष्यात तंत्रज्ञानयुक्त युवा पिढीची जगाला गरज आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी जगाचे नेतृत्व करणार आहे. मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घ्या व जगाचे नेतृत्व करा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी ते आज सावंतवाडी येथे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, डॉ. उदय पाटील, उपसंचालक कमलादेवी आवटे, डॉ. राधा अतकरी, उपसंचालक महेश चौथे, प्राचार्य सुशील शिवलकर, सुभाष चौगुले, प्रदीप कुमार कुडाळकर, तेजस्विनी आळवेकर, प्रभाकर क्षीरसागर, प्रवीण राठोड, पाडुरंग काकतकर, कल्पना बोडके, शैलेश पई, अशोक दळवी, नारायण मानकर उपस्थित होते.

सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात राज्यभरातील आठ विभागीय संघाने सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!