कणकवलीत 39 हजाराचा गांजा जप्त

कणकवलीत 39 हजाराचा गांजा जप्त

*कोकण Express*

*कणकवलीत 39 हजाराचा गांजा जप्त*

*स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मोठी कारवाई*

*अंमली पदार्थ विरोधात पोलीस दल आक्रमक*

अंमली पदार्थविक्री विरोधात एसपी सौरभ अग्रवाल यांनी जोरदार मोहीम उघडली असून कणकवली शहरात 38 हजार 800 रुपये किंमती चा 1 किलो 110 ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने काल 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबी ने ही मोहीम फत्ते केली. या गुन्ह्यात निलेश ज्ञानदेव साटम (वय 44, रा. जानवली गावठणवाडी), आणि चेतन रामू जाधव (वय 20 वर्षे, रा. कलमठ कुंभारवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 50 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल रोख, 180 रुपये आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे. ही कारवाई एसपी अग्रवाल यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद घाग, पीएसआय आर बी शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली. फिर्याद हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पीएसआय शरद देठे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!