*कोकण Express*
*मातोंड ग्रा.पं. सदस्यपदी शिवसेना शिंदे गटाच्या आर्या रेडकर बिनविरोध*
*शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत*
वेंगुर्ले दाजी नाईक मार्तोड ग्रामपंचायत सदस्यपदी शिवसेना शिंदे गटाच्या सौ आर्या अरूण रेडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचा आणि शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेले मातोड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि मनसेचे विद्यार्थी सेना सिंधुदूर्ग जिल्हा उपाध्यक्ष परशुराम दत्ताराम परब उर्फ आबा परब या दोघांचा शिवसेना नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, मा. जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर तसेच वासुदेव कोंडये, अशोक घोगळे, दिनकर रेडकर आदी उपस्थित होते.