*कोकण Express*
*तळेरे येथे वेशभूषा लक्षवेधी : विधवा स्त्रियांचा विशेष सत्कार*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे वाघाचीवाडी येथील शेवरादेवी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उत्साहात नवरात्रौत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यादरम्यान विधवा स्त्रियांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. दररोज विविध स्पर्धांना रसिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दररोज सायंकाळी महा आरती आणि प्रसाद त्यानंतर रास गरबा आयोजित करण्यात आले. या दरम्यान फुगडी, वेशभूषा, संगीत खुर्ची आणि खास आकर्षण समई नृत्य ठरले. टाळ्यांचा कडकडाट, डोळ्यांचे पारणे फिटनारा तो नजराणा पाहताना अनेकजण त्या सर्वच कलाकारांचे कौतुक करत राहिले. तर विधवा 26 स्त्रियांचा सन्मान करताना अशा सर्व स्त्रियांना साडी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या दरम्यान अनेक मान्यवरांनी या नवरात्रौत्सवाला भेट दिली. त्या सर्वांचे सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आले. हे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मुंबई मंडळ, वाडीतील ग्रामस्थ, महिला मंडळ, बचत गट या सर्वांचेच सहकार्य मिळाले. या दरम्यान असंख्य बक्षिसे वाटप करण्यात आली. आणि वेशभूषा स्पर्धेत अनेकांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.