*कोकण Express*
*रिक्षा चालक मालकांच्या न्याय हक्कांसाठी उद्या २८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे विशेष चर्चा सत्राचे आयोजन*
*सर्व रिक्षा चालक- मालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
रिक्षा चालक मालकांच्या न्याय हक्कांसाठी उद्या २८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सर्व रिक्षा चालक- मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजकारण विरहित रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्रित लढा उभारुन आणि रिक्षाचालकांना समृद्ध बनविण्यासाठी.
सर्व रिक्षा चालकांना संघटीत करून संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग , रायगड जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या काळात मुक्त रिक्षा परवाना वाटपासह दुचाकी टॅक्सी परवाना तसेच ई रिक्षा विना परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. तसेच शासनाने बदललेल्या धोरणामुळे रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसह मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च व इतर खर्च करते वेळी शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात रिक्षा व्यावसाय ठप्प झाल्याने कर्जबाजारी होवून काही रिक्षाचालकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. यामध्ये काही रिक्षाचालक मृत्युमुखी देखील पडले आहेत. परिवहन विभाग व पोलिस प्रशासन यांच्यामुळे रिक्षाचालकांना दिवसेंदिवस रिक्षा व्यवसाय करणे खूप कठीण होत चालले आहे.
तरी या जुलूमशाही विरोधात जन आंदोलन करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शनिवार दिनांक २८/१०/२०२३ रोजी सकाळी ठीक १०:३० रत्नागिरी येथे विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिक्षा चालक मालक कृती समिती पुणे जिल्हा सरचिटणीस- नितीन पवार,
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष – संतोष भि.नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव- सुधीर पराडकर उपस्थित राहणार आहेत. प्रताप भाटकर- (अध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक मालक असोसिएशन – रत्नागिरी)
दिलीप खेतले- (अध्यक्ष- रिक्षा चालक-मालक संघटना- चिपळूण), सुनील भालेकर (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना खेड), लवू कांबळे- (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना लांजा), संतोष सातवसे- (सचिव
रिक्षा चालक-मालक संघटना,राजापूर), अशोक वाडेकर- (अध्यक्ष स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना-रत्नागिरी),
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार तळेकर (तळेरे – कणकवली), जिल्हा उपाध्यक्ष नागेश ओरसकर (ओरोस ), महेश मयेकर अध्यक्ष रिक्षा चालक मालक संघटना (मालवण),भरत तळवडेकर कणकवली, रवी माने कुडाळ उपस्थित राहणार आहेत.
तरी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्षा संघटनेच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक मालकांनी शनिवार दि.28/10/2023 रोजी सकाळी 10.30 वाजता दत्त कृपा मंगल कार्यालय, नवीन नगरपरिषद भाजी मार्केट जवळ, रत्नागिरी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच याबाबत अधिक माहितीसाठी प्रताप भाटकर- ९७६५३९८९९८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.