*कोकण Express*
*मटका खेळताना एक ताब्यात; स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची वैभववाडीत कारवाई…*
*वैभववाडी / प्रतिनिधी*
वैभववाडी बाजारपेठेतील शासकीय गोदामाजवळ मटका जुगाराची रक्कम घेताना येथील रुपेश ऋषिकेश घाडीगावकर (37) याला पोलिसांनी काल ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग या पथकाने दुपारी 3.30 च्या दरम्यान ही कारवाई केली असून रोख रक्कम 3 हजार 50 रुपये व जुगाराचे साहित्य संशयिताकडून जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला बाजारपेठेतील शासकीय गोदामा नजीक मटका जुगार घेतला जातो अशी गुप्त माहिती मिळाली असता. त्यानुसार या पथकाने काल या भागात दुपारी सापळा लावला होता. यावेळी संशयित आरोपी घाडीगांवकर हा मटका जुगाराची रक्कम जमा करीत असताना रंगेहाथ सापडला. यावेळी त्याच्याकडे सापडलेल्या एका को-या कागदावर कल्याण असं लिहून त्याच्या पाठीमागे मटक्याची आकडेमोड केली होती. तसेच एक पेन व 3 हजार 50 रुपये असा मुद्देमाल सापडला. पोलीसांनी पंचांच्या समक्ष हा
मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई मो.हे. श्री खंडे, श्री डिसोझा, श्री गंगावणे, पो. कॉ. जयेश सरमळकर यांनी केली आहे.

