*कोकण Express*
*कणकवलीतील शाळा स्वयंभू विद्यामंदिर नं. २ च्या वर्ग खोल्यांच्या कामाचा शुभारंभ*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील शाळा नंबर 2 च्या दोन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कामासाठी अंदाजीत रक्कम 19 लाख मंजूर असून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून व कणकवली नगरपंचायत च्या पाठपुराव्याने जि. प. शाळा स्वयंभू विद्यामंदिर नं. २ इमारत बांधणीचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. ह्याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, प्रशांत सावंत, प्रा. हरिभाऊ भिसे, अनिल पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयुरी मेस्त्री, मुख्याध्यापिका प्राजक्ता सावंत, पदवीधर शिक्षक वंदना राणे, जमीन मालक महादेव घाडीगावकर, अक्षय घाडीगावकर, तसेच जमीन मालक कै. विठोबा राणे यांना याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली.