*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात कोकण पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि तहसील कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट महाविद्यालयात कोकण पदवीधर मतदार संघातील नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार प्रिय परब – हर्णे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी सुमारे 158 पदवीधर मतदारांनी आपली नाव नोंदणी केली. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघांसाठी 76 नवीन मतदारानी नाव नोंदणी केली.
अभियान यशस्वी करण्यासाठी फोंडाघाट तलाठी संतोष सावंत, महसूल सहाय्यक सोमनाथ देशमुख, एन एस एस विभाग प्रमुख डॉ .बालाजी सुरवसे, दीपक सावंत इत्यादी मान्यवरांनी बहुमोल योगदान दिले.
यावेळी फोंडाघाट पंचक्रोशीतील पदवीधरांनी कोकण पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.