*कोकण Express*
*कलमठ युवासेनेच्या वतीने एसटी बस वेळापत्रक फलक अनावरण*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते अनावरण*
*कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांची संकल्पना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कलमठ विभाग युवासेनेतर्फे कणकवली पोलीस स्टेशन परिसर, कलमठ आचरा रोडलगत माणिक चौकालगत, कलमठ सुतारवाडी याठिकणीच्या बस थांब्यांवर एसटी बस फेऱ्यांचे वेळापत्रकाचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचे अनावरण युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले.
यावेळी कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, ठाकरे सेनेचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे, ठाकरे सेनेच्या तालुका महिला आघाडीप्रमुख वैदही गुडेकर, सचिन आचरेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, निसार शेख, विलास गुडेकर, नंदकिशोर कोरगावकर, प्रणय शिर्के, चेतन पाटील आदी उपस्थित होते
कणकवली पोलीस स्टेशन परिसरातील बस स्टॉप लगत असलेल्या माणिक चौक, सुतारवाडी येथील बसस्टॉपवर एसटीच्या बस फेऱ्यांचे वेळापत्रक नसल्यामुळे प्रवाशांना कोणती बस केव्हा येणार आहे. याची माहिती मिळत नसल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन धीरज मेस्त्री यांच्या संकल्पनेतून याठिकाणी बस वेळापत्रकाचे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक कणकवली बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांनी दिलेल्या माहितीनुसार लावण्यात आले आहेत.