*कोकण Express*
*गांगेश्र्वर मित्र मंडळ आयोजित पैठणी स्पर्धेस महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद*
*अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ*
या सर्धेमध्ये 66 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे नियोजन गांगेश्र्वर मित्रमंडळाच्या वतीने शितल मांजरेकर यांनी केले होते . रंजक खेळ आणि अभिनेते कलाकार निलेश पवार यांनी केलेल्या सूत्रसंचालन यामुळे स्पर्धेची रंगत उत्तोरोत्तर वाढत गेली , मंडळाचे कार्यकर्ते योगेश जाधव , परेश परब , रामदास मांजरेकर, रोशन जाधव , सागर राणे , राहुल वालावलकर , आर्डेकर, हुलजी , खरात , चांनी जाधव यांच्या चोख नियोजनामुळे अतिशय सुंदर रित्या स्पर्धा पार पडली . या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक निधी निलेश पाटणे (पैठणी ), द्वितीय पारितोषिक ( पैठणी )प्रिया दशरथ चव्हाण , तृतीय पारितोषिक अर्चना गावडे (गिफ्ट) यांनी पटकावले . बक्षीस वितरण साठी **क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या लोकप्रिय मालिकेतील ” गावमामी ” ची भूमिका साकारणाऱ्या सौ . अक्षता कांबळी* यांच्या हस्ते तीनही बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिलांच्या उस्पूर्त प्रतिसाद , शितल मांजरेकर यांचे सुंदर नियोजन आणि गंगेश्र्वर मित्रमंडळाचे उकृष्ठ व्यवस्थापन याचे मालवणी भाषेतून तोंडभरून कौतुक केले. महिलांनी दिलेल्या या उस्पुर्त प्रतिसाद बद्दल शितल मांजरेकर यांनी सर्व महिलांचे आभार मानले. तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांची मानाची ओटी देवून सन्मान करण्यात आला . अतिशय उत्साहात हा पैठणीचा खेळ संपन्न झाला.