*कोकण Express*
*भाजपा कामगार मोर्चा कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर यांची सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालयाला भेट*
*भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत*
*भाजपा कामगार मोर्चाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना न्याय देणार*– *लिलाधर भडकमकर*
मोदी सरकारने ” मेक इन इंडिया ” व ” स्टार्ट अप ” या योजना सुरू केल्यामुळे कामगारांना *अच्छे दिन* पहायला मिळाले. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात उद्योगधंद्यांना लागणारया पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला , त्यामुळे देशात उद्योगवाढीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे . गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या आहेत . कामगार विषयक कायद्यात केलेल्या सुधारणा , परवाने आणि लायसन्स मिळण्यासाठी सुटसुटीत ई परवाना पद्धती , यामुळे गुंतवणूक स्थळ म्हणून भारताचे स्थान उंचावले आहे . यामुळे रोजगार निर्मिती झाली व कामगारांना काम मिळाले .
मोदी सरकारच्या ई – श्रम कार्ड मुळे असंघटित कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळाली . ई – श्रम कार्ड अंतर्गत कामगारांना सरकारी योजना सहज मिळु लागल्या , त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे . लवकरच विधानसभा मतदारसंघ निहाय दौरा करून कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , कामगार मोर्चा सिंधुदुर्ग अध्यक्ष अशोक राणे , रत्नागिरी भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस उदय गोवळकर , जेष्ठ पदाधिकारी निलेश तेंडोलकर , जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे , सेवा शक्ती संघर्ष एस.टी.युनियनचे विभागीय कार्याध्यक्ष संतोष भाट इत्यादी उपस्थित होते .