एम के सी एल व सिंधुदुर्ग पोलीस यांची फोंडाघाट मधील शाळा कॉलेज मध्ये सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस मोहीम

एम के सी एल व सिंधुदुर्ग पोलीस यांची फोंडाघाट मधील शाळा कॉलेज मध्ये सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस मोहीम

*कोकण Express*

*एम के सी एल व सिंधुदुर्ग पोलीस यांची फोंडाघाट मधील शाळा कॉलेज मध्ये सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस मोहीम*

*सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम थेट विद्यार्थ्यांपर्यंत*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस व एमकेसीएल यांच्या वतीने शाळा कॉलेज तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन केले
कणकवली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उत्तम वंजारे यांनी सायबर गुन्हेगारी व त्यापासून कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्मार्टफोन अर्थात आधुनिक मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यावर व्हाट्सअप, ट्वीटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट इत्यादीं समाजमाध्यमाचा वापर केला जातो. एटीएम कार्डद्वारे होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कार्डवरील सीव्हीव्ही अंक गुप्त ठेवावा, पिन सतत बदलावा आणि कुणालाही सांगू नये व ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना आलेला ओटीपी इतरांना सांगू नये. सायबर गुन्हेगार विविध अमिषे दाखवणारे एसएमएस, ई-मेल मेसेज तुम्हाला पाठवत असतात, त्या अमिषाला बळी पडू नये. सहलीच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर काढलेले फोटो तेथूनच समाजमाध्यमावर न टाकता, घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजमाध्यमावर टाकावेत म्हणजे चोरी व घरफोडी सारखे प्रकार टाळता येतील. दुसऱ्याकडून ऑनलाइन रक्कम घेताना क्यूआर कोड किंवा पिन याची गरज लागत नाही हे लक्षात ठेवावे. ऑनलाइन खरेदी करताना ती वेबसाईट खरी असल्याची खात्री करावी. बनावट वेबसाईट द्वारे तुमचा एटीएम कार्ड नंबर, पिन याची माहिती मिळवली जाते व आर्थिक फसवणूक केली जाते. हल्ली रात्रीच्या वेळी महिलांकडून व्हिडिओ कॉल करून तुम्हाला ब्लॅकमेल केले जाते व तुमच्या चारित्र्याची धमकी देऊन आर्थिक लूट केली जाते. त्यामुळे अशा व्हिडिओ कॉल पासून संयमाने दूर राहिले पाहिजे. तरीही काही सायबर चूक आपल्या हातून झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करावी. जितक्या लवकर तक्रार केली जाईल, तितक्या लवकर आपली गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता असते.

इनसाईट कॉम्प्युटरचे प्रशांत वंजुळे यांनी सांगितले की, एटीएम कार्डचा सोळा अंकी नंबर, तीन अंकी सीवीवी कोड व चार अंकी पिन ही माहिती गोपनीय राहील याची खबरदारी घ्यावी. ऑनलाइन आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी सार्वजनिक सायबर कॅफेचा वापर न करता वैयक्तिक संगणक अथवा स्मार्टफोन याचा वापर करावा. एटीएम मशीन मधून रक्कम काढताना आपल्या आसपास कोणी नाही याची काळजी घ्यावी. स्मार्टफोनचा वापर शैक्षणिक अभ्यासासाठी करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न करावा, यातच युवा पिढीचे हित आहे असा सल्लाही त्यांनी दिला.

रचना कॉम्प्युटरचे गणेश ईस्वलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व प्रश्नमंजुषा घेतली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जनरल नॉलेजचे प्रश्न विचारून उपस्थित विद्यार्थ्यांमधून तीन विजेते निवडून विजेत्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरव केला
असे कार्यक्रम फोंडाघाट मधील सर्व शाळा कॉलेज व महाविद्यालये त्याचबरोबर घोणसरी हायस्कूल कुर्ली हायस्कूल विद्यामंदिर हरकुळ,लोरे नंबर २, हायस्कूल व ज्ञानप्रबोधिनी करुळ इत्यादी ठिकाणी सादर करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!