*कोकण Express*
*बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये देवी शारदा मातेसाठी सजवले
इकोफ्रेंडली मकर*
प्रतिवर्षी आनंदाची पर्वणी घेऊन येणारी आणि उत्साहाला उधाण आणणारी विद्येची देवता शारदे मातेसाठी यावर्षी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नारळाच्या झावळच्या, केळीच्या पानाच्या व सुगरणीच्या टाकावू घरट्याच्या सहाय्याने साकारले कलात्मक व देखणे इकोफ्रेंडली मकर.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील कला शिक्षक प्रसाद कानडे यांच्या कल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यावर्षी नाविन्यपूर्ण असे इकोफ्रेंडली मकर साकारले आहे.
वालावल-हुममळा येथील रहिवासी असलेले प्रसाद कानडे हे नेहमीच वैविध्यपूर्ण सत्यनारायणाची मकरं , मंदिरातील वैविध्यपूर्ण सजावट साकारण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. ते दरवर्षी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेतील विविध उपक्रमांमध्ये ,विविध कार्यक्रमांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी सजावट करत असतात आणि त्यामुळे यावर्षी केलेलं हे सरस्वती मातेचे इकोफ्रेंडली मकर सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे.आणि विशेष कौतुकाची थाप घेऊन गेले.. यांच्या जोडीला मुला-मुलींची भजनंही शार्दोत्सवाची शोभा वाढविणारी व शारदोत्सव अधिकच खुलविणारी ठरली.
संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्ऱ्यानी यांच्या या कल्पकतेचे विशेष कौतुक केले आहे.