*कोकण Express*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीचे केले मार्गदर्शन*
*त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशाळेत पोलीस दल सिंधुदुर्ग आणि एम. के. सी. एल यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी आणि जनरल अवेअरनेस उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उद्बोधन करण्यात आले. आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. संदीप कांबळे, पोलीस काॅन्स्टेबल श्री. महेश जगताप आणि एम के सी एल च्या संचालिका श्रीमती माधवी परब यांनी मार्गदर्शन व उद्बोधन केले. यावेळी श्रीमती माधवी परब यांनी पाॅवर पाॅईन्टच्या माध्यमातून सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? यात कोणकोणते प्रकार आहेत आणि काय उपाययोजना करणे आवश्यक असून कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी उपस्थितांचे श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. श्री. व्ही डी काणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अशा प्रकारचा जनजागृती करण्यासाठी पोलीस दल सिंधुदुर्ग यांच्या वतीने उपक्रम राबविला त्याबद्दल उपस्थित सर्वांना व सिंधुदुर्ग पोलीस दलाला मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी धन्यवाद दिले*