*कोकण Express*
*वेंगुर्ले तालुक्यातील पत्रकार सदस्यांना जिल्हा पत्रकार संघातर्फे ओळखपत्राचे वितरण…*
*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे*
पत्रकार यांची खरी ताकत ही एकोप्यामध्ये असून सर्व पत्रकार एकोप्याने राहिल्यास आपण अनेक प्रश्न मार्गी लावू शकतो. वेंगुर्लेतील पत्रकारांची एकी अशीच टिकवून ठेवा यासाठी जिल्हा पत्रकार संघाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी केले.
वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती तर्फे आज तालुक्यातील पत्रकार सदस्यांना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या हस्ते पत्रकार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भरत सातोस्कर, जेष्ठ पत्रकार प्रदीप सावंत, तालुका पत्रकार संघाचे सचिव दाजी नाईक, सदस्य सीमा मराठे, आपा परब, मॅक्सि कार्डोज, विनायक वारंग, अजित राऊळ, दिपेश परब, प्रथमेश गुरव, सुरज परब, एस एस धुरी, अनिल राणे, संदेश राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष झाल्याबद्दल अनिल राणे यांचे व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार प्राप्त दिपेश परब यांचा जिल्हाध्यक्ष जेठे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष के. जी गावडे, सूत्रसंचालन दाजी नाईक यांनी तर आभार प्रदर्शन सीमा मराठे यांनी केले.