कनेडी प्रशालेचा पंकज चव्हाण राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत प्रथम

कनेडी प्रशालेचा पंकज चव्हाण राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत प्रथम

*कोकण Express*

*कनेडी प्रशालेचा पंकज चव्हाण राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत प्रथम*

*कणकवलीत ः प्रतिनिधी*

राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू कु. पंकज महेंद्र चव्हाण याने १७ वर्षे वयोगट व ५१ वजनी गटात राज्यस्तरीय तायकांदो क्रीडा प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.*
*या क्रीडा प्रकारात त्याला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला, ही स्पर्धा दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई (मुलुंड) येथे संपन्न झाली*

*या खेळाडूला प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा मार्गदर्शक बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूचे संस्था अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!