पुस्तके वाचा आणि समृध्द व्हा!*निकेत पावसकर : तळेरे विद्यालयात ‘वाचाल तर वाचाल’ चे उद्घाटन

पुस्तके वाचा आणि समृध्द व्हा!*निकेत पावसकर : तळेरे विद्यालयात ‘वाचाल तर वाचाल’ चे उद्घाटन

*कोकण Express*

*पुस्तके वाचा आणि समृध्द व्हा!*निकेत पावसकर : तळेरे विद्यालयात ‘वाचाल तर वाचाल’ चे उद्घाटन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

आपल्या विद्यालयात वेगळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम असलेल्या ‘वाचाल तर वाचाल’ चा सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. त्यातील पुस्तके वाचा आणि समृध्द व्हा, असे प्रतिपादन संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी केले. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘वाचाल तर वाचाल’ या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे फित कापून उद्घाटन निकेत पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्व. सुनील तळेकर वाचनालयाचे उपाध्यक्ष राजू वळंजू, सदस्य डॉ. अभिजित कणसे, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, प्रा. हेमंत महाडिक, प्राचार्य अविनाश मांजरेकर, श्रावणी कंप्युटरचे सतीश मदभावे, प्रज्ञांगण च्या श्रावणी मदभावे, ध्रुव बांदिवडेकर, रेश्मा तळेकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल साक्षी तळेकर, नांदलसकर, सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी या उपक्रमाची माहिती देताना प्राचार्य अविनाश मांजरेकर म्हणाले की, आमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असंख्य पुस्तकांचे खुले द्वार म्हणजे हा ‘वाचाल तर वाचाल’ हा उपक्रम म्हणता येईल. इथे कोणतीही सक्ती नाही, कोणतीही नोंद नाही. आपल्याला आवडेल ते पुस्तक तिथून घ्यायचे, घरी जाऊन वाचून पुन्हा तिथे आणून ठेवायचे. यामध्ये मुलांना कोणतीही सक्ती नाही, बंधन नाही. यामुळे मुलांचे वाचन कौशल्य वाढेल. मुले पुन्हा वाचनाकडे वळतील.

*मुलांना पुस्तकाचे खुले द्वार*
या उपक्रमाअंतर्गत मुलांना पुस्तके उपलब्ध होणार आहेत. 5 वी ते 7 वी तील मुले आपल्या आवडीची पुस्तके कोणालाही न विचारता घरी वाचायला घेऊन जाऊ शकतात. पुन्हा ती आणून दुसरी नेऊ शकतात. यामध्ये सध्या 300 पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!