*कोकण Express*
*युवासेनेचे प्रश्न योग्यच…जनतेतून चांगला प्रतिसाद विधान सभा मतदार संघात 10 हजार पत्रक वाटणार….??*
वैभववाडी / प्रतिनिधी :- सुशांत नाईक यांनी विचारलेले दहा प्रश्न योग्यच आहेत याबाबत जनता समाधान व्यक्त करीत आहेत. युवासेनेचे प्रश्न जनता निवडणूकीच्या वेळी नक्कीच विचारतील असा विश्वास युवा सेनेचे तालुकाप्रमुख रोहीत पावसकर यांनी व्यक्त केला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारलेले दहा प्रश्नांची पत्रके भुईबावडा, उंबर्डे,कोळपे, महबूबनगर, वैभववाडी शहर, येथे वाटप करण्यात आली. कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यात १० हजार पत्रक वाटप करण्यात येणार आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत असून याभागातील अनेक समस्या असल्याचे लोकांनी सांगितले .स्थानिक आमदार नितेश राणे यांनी निवडणूकीत दिलेल्या घोषणाच राहील्या आहेत. आगमी निवडणूकीत येथील जनता प्रश्न विचारतील.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख श्री.सुशांत नाईक,शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर, युवासेना सरचिटणीस स्वप्निल धुरी, युवासेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावस्कर, बाबा मोरे उप तालुका संघटक, जनार्दन विचारे माजी उप तालुका प्रमुख, रवी मोरे शिवसेना शहरप्रमुख, जावेद पाटणकर अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख, मनोज सावंत नगरसेवक वैभववाडी, सुनील कांबळे सरपंच कोळपे, मयूर दळवी युवासेना विभागप्रमुख कोकेसरे, गणेश पवार युवासेना विभागप्रमुख खंबाळे, विठोजी पाटील शिवसेना विभागप्रमुख कोकिसरे,संदेश सुतार युवासेना कोकिसरे विभाग संघटक, मंथन सुतार, गणेश धुरी,शुभम चव्हाण,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.