खांबाळे सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राजक्ता कदम यांची बिनविरोध निवड

खांबाळे सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राजक्ता कदम यांची बिनविरोध निवड

*कोकण Express*

*खांबाळे सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राजक्ता कदम यांची बिनविरोध निवड*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

खांबाळे गावच्या सरपंच गौरी पवार यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्याची निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली. यावेळी सरपंच पदी प्राजक्ता कदम यांची सदस्यांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी राजाराम लांबोरे यांनी काम पाहिले.
२०२० साली झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकित शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्या नेतृत्वाखाली खांबाळे गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनींनी लोके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ९ पैकी ९ सदस्य एकहाती सत्ता देऊन निवडून आणले होते. खांबाळे गावचे सरपंच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या सरपंच पदी गौरी पवार यांची ११ फेब्रुवारी २०२१ रोजी निवड केली होती. त्यांनी आपला अडीज वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपल्या सरपंच पदाचा राजीनामा प्रशासक तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी यांच्याकडे सादर केला होता. आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणूकित प्राजक्ता कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने खांबाळे सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी सरपंच गौरी पवार यांनी नवनिर्वाचित सरपंच प्राजक्ता कदम यांना पुष्पगुच्छ,शाल देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक चव्हाण, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, मंगेश लोके यांनी माजी सरपंच गौरी पवार यांच्या कामकाजाचे कौतुक करून नवनिर्वाचित सरपंच प्राजक्ता कदम यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,माजी सरपंच गौरी पवार,उपसरपंच गणेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक चव्हाण, सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम,ग्रामपंचायत सदस्य तथा चेअरमन प्रविण गायकवाड,मंगेश गुरव,दर्शना मोरे,ग्रामसेवक नयना गुरखे,माजी सरपंच विठोबा सुतार,माजी चेअरमन सुनिल पवार, प्रसाद कदम,राजेंद्र देसाई,मंगेश कदम,अशोक पवार,शांताराम कदम, प्रभाकर केशव पवार, सुनिल गुरव, विलास मोहिते,सत्यवान सुतार,नंदकुमार पवार,दिलीप पवार, लक्ष्मीबाई सुतार,उमा कदम,पुष्पलता वैशाली कदम, ग्रामपंचायत कर्मचारी अंबाजी पवार, नंदु पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!