नवरात्रौत्सवात राजेंद्र मनोहर पेडणेकर सुपुत्र किशन (भैया )याच्या २८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही कणकवलीकर मित्र मंडळाच्या वतीने नवदुर्गेचा सन्मान करण्यात आला

नवरात्रौत्सवात राजेंद्र मनोहर पेडणेकर सुपुत्र किशन (भैया )याच्या २८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही कणकवलीकर मित्र मंडळाच्या वतीने नवदुर्गेचा सन्मान करण्यात आला

*कोकण Express*

*नवरात्रौत्सवात राजेंद्र मनोहर पेडणेकर सुपुत्र किशन (भैया )याच्या २८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही कणकवलीकर मित्र मंडळाच्या वतीने नवदुर्गेचा सन्मान करण्यात आला*

आज दिनांक १८/१०/२०२३ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून श्री अशोक करंबेळकर(जेष्ठ पत्रकार) दादा कुडतरकर( जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष) आणि संजय मालंडकर (रिक्षा संघटना) आणि सुभाष उबाळे (नगरपंचायत निवृत्त कर्मचारी) यांच्या हस्ते नवदुर्गा सौ. शितल रामदास मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच या प्रसंगी १५ दिवसा पूर्वी वॉटर सप्लाय मुंबई विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी, कणकवली चे सुपुत्र श्री सदानंद पारकर यांचा ही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना , मानव साधन विकास संस्था संचलित “जन शिक्षण संस्थान, सहायक सौंदर्य चिकिस्तक प्रशिक्षण अशा एक ना अनेक संस्था न मध्ये आपले स्वतः चे ब्युटी पार्लर आणि आपल्या पतिदेवांच्या हॉटेल मध्ये सहभागी होऊन, तसेच गृहिणी ची सर्व कामे हसत मुखाने करणार्या नवदुर्गे चा सन्मान करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे मनोगत श्री अशोक करंबेळकर यांनी व्यक्त केले
दादा कुडतरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आई भवानी च्या नामाचा जयघोष केला
यावेळी किशन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अप्पासाहेब पटवर्धन चौकात सर्वांना जिलेबी वाटप करण्यात आले
या प्रसंगी सईद नाईक, बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, चंद्रकांत चव्हाण, देवराज जाधव आणि पेडणेकर यांचा सर्व मित्र परिवार उपस्थित होता
सत्कार मूर्तींना सर्वांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!