घोणसरी येथे आज हरिनाम सप्ताह

घोणसरी येथे आज हरिनाम सप्ताह

*कोकण Express*

*घोणसरी येथे आज हरिनाम सप्ताह*

*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले*

घोणसरीचे जागृत देवस्थान श्री देव गणपती मंदिर मध्ये आज (गुरुवार) पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

उद्या गुरुवारी या सप्ताहाला सुरुवात होईल. प्रतिवर्षी हा हरिनाम सप्ताह होत असून त्याला विविध ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. दररोज विविध भजने सादर होणार असून या मंदिरात जिल्ह्यातील अनेक नामवंत भजनी बुवा भजन सादर करण्यासाठी येतात. बुधवारी पाशांकुषा एकादशीला (दि. 25) या सप्ताहाचा शेवट होईल. तर गुरुवार दि. 26 ऑक्टोबरला पहाटे काकड आरती, नवस फेड व नवीन नवस बोलणे, दिंडी असा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होऊन समाप्ती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!