*कोकण Express*
*शिरोडा गावचे सुपुत्र ऋषिकेश डीचोलकर विशेष सेवा पदकाने सन्मानित…*
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गावचे सुपुत्र आणि मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे कमांडो ऋषिकेश राजन डीचोलकर हे विशेष सेवा पदकाने सन्मानित झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
ऋषिकेश राजन डिचोलकर हे गेली सात वर्षे पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या लोहमार्ग पोलीस दलात जलद प्रतिसाद पथक (क्यू.आर. टी. कमांडो) म्हणून सेवा बजावतात. महाराष्ट्र राज्य फोर्स वन कमांडो म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुंबई पोलीस महासंचालक यांच्यातर्फे विशेष सेवा पदक मंजूर झाले होते. हा पदक प्रदान कार्यक्रम समारंभपूर्वक लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. ऋषिकेश याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवसेनेच्या रेडी विभाग महिला संघटक रश्मी डिचोलकर यांचा ऋषिकेश मुलगा आहे.