सिंधू युवा विशालोत्सव’ सांस्कृतिक महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद*

सिंधू युवा विशालोत्सव’ सांस्कृतिक महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद*

*कोकण Express*

*’सिंधू युवा विशालोत्सव’ सांस्कृतिक महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद*

*समूह नृत्य स्पर्धेत पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, जोडी नृत्य स्पर्धेत दिक्षा व संजना,मिमिक्री स्पर्धेत राहुल कदम यांची बाजी*

‘वसा जनसेवेचा सोहळा जन्मदिनाचा’ या संकल्पनेवर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम श्री विशाल प्रभाकर मित्र मंडळ आणि भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग यांच्यावतीने संपन्न होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि युवाईला नवचेतना देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धा, जोडी नृत्य स्पर्धा, मिमिक्री स्पर्धा चे आयोजन वेंगुर्ला येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या सांस्कृतिक सिंधु युवा विशालोत्सव.. शोध नाविन्याचा या सांस्कृतिक महोत्सव चे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, जेष्ठ कार्यकर्ते शरदजी चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुहास गवडळकर, रमेश नार्वेकर, वसंत तांडेल , बाबली वायंगणकर , जयंत मोंडकर,शैलेश जामदार, दशावतर जेष्ठ नटवर्य पप्पू नांदोसकर, महेंद्र मातोंडकर , सुरेंद्र चव्हाण , बाळू प्रभू , बी.टी.खडपकर, संजय पाटील, प्रा. सचिन परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अशा सांस्कृतिक महोत्सवाची नितांत आवश्यकता असून त्यातून युवक- युवतींनी आपले कलागुण जोपासावे असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले, तर सिंधुदुर्गातील महाविद्यालयातील युवाई ला एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांनी आयोजकांना धन्यवाद देत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
‘भारताची लोक परंपरा’ या विषयावर समूह नृत्य स्पर्धा तर ‘वेस्टर्न’ गीतावरती जोडी नृत्य स्पर्धा आणि मिमिक्री स्पर्धा अशा तीन स्पर्धा संपन्न झाल्या. तिन्ही स्पर्धांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवतीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तिन्ही स्पर्धा मद्ये जिल्ह्यातील सुमारे २८५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला.
*समूह नृत्य स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे:*
*प्रथम क्रमांक:* श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
*द्वितीय क्रमांक:* परी डान्स क्रिएशन,कुडाळ
*तृतीय क्रमांक:* न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा
*उत्तेजनार्थ प्रथम:* गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय,वेतोरे.
*उत्तेजनार्थ द्वितीय:* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय ,वेंगुर्ला

*जोडी नृत्य स्पर्धा*
*प्रथम क्रमांक:* दिक्षा नाईक व संजना पवार
*द्वितीय क्रमांक:* नंदिनी बिले व विद्या मादाकाचे
*तृतीय क्रमांक:* आरव आईर व तन्मय आईर
*उत्तेजनार्थ प्रथम:* जयेश सोनुर्लेकर व दिशंम परब
*उत्तेजनार्थ द्वितीय*: विधी नाईक, सानिया वराडकर

*मिमिक्री स्पर्धा*
*प्रथम क्रमांक* राहुल विठ्ठल कदम
*द्वितीय क्रमांक*: सौरव प्रदीप माळवदे
*तृतीय क्रमांक*: विजय रामा फाले
*उत्तेजनार्थ प्रथम*: शाम पांडुरंग निवलेकर
*उत्तेजनार्थ द्वितीय*: नाना हरिश्चंद्र कांबळी.
या संपूर्ण स्पर्धेत स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक- युवतींकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे परीक्षण महेंद्र मातोंडकर व बी.टी. खडपकर यांनी केले. सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर आणि आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!