*कोकण Express*
*मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका नवदुर्गेचे भाजपा नेते , माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते सपत्नीक पुजन*
मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका वेंगुर्ले च्या वतीने दरवर्षी नवरात्रौत्सवात नवदुर्गेचे पुजन केले जाते . तसेच दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते देवीचे पूजन केले जाते . त्यावर्षी मंडळाच्या वतीने प्रथम पुजेचा मान भाजपा नेते व माजी आमदार राजन तेली यांना देऊन सपत्नीक पुजन केले . मंडळाचे हे २८ वे वर्ष असून , वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात पहिला नवरात्रौत्सव या मंडळाने सुरू केल्यामुळे जिल्ह्यात या मंडळाचा नावलौकिक आहे .
दरवर्षी नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते , यामध्ये भजन , दशावतार , विविध स्पर्धा , महीलांची फुगडी , नाटक , ऑर्केस्ट्रा , होम मिनिस्टर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . तसेच वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम या मंडळा मार्फत राबविण्यात येतात .
दिनांक १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे . आज नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीचे पूजन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने राजन तेली यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी मंडळाचे अध्यक्ष दादा कुबल , नवरात्रौत्सव समिती उपाध्यक्ष उपेंद्र तोटकेकर , प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , वसंत तांडेल , सुहास गवंडळकर , सुनील डुबळे , संदेश निकम , जयंत मोंडकर , शरद मेस्त्री , पुरोहित – श्रीकांत रानडे व राघवेंद्र जोशी , तुषार साळगांवकर , रमेश नार्वेकर , नंदु जुवलेकर , प्रमोद वेर्णेकर , रविंद्र शिरसाठ , भुषण आंगचेकर , भुषण सारंग , सुधिर डिचोलकर , भानुदास मांजरेकर , अविनाश सडवेलकर , अविनाश गिरप , राहुल मडकईकर , मारुती दोडशानट्टी तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .